Date:2009-11-19

पुण्याच्या राजर्षी शाहू बँकेला सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून सन्मान

s

पुणे:- गेल्या २५ वर्षांपासून बँकींग क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करणा-या राजर्षी शाहू बँकेला महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन तर्फे घेण्यात आलेल्या २०० कोटीच्या आतील बँकांच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून सन्मानित करण्यात आले. तत्कालीन सहकार आयुक्त व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे निबंधक डॉ. कृष्णा लव्हेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी हा पुरस्कार स्विकारला. या वेऴी बँकेचे अध्य्क्ष्य आबासाहेब शिंदे, संचालक सुधाकरराव पन्हाळे, माजी उपाध्य्क्ष बाळासाहेब वणवे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार चोपडा आदि उपस्थित होते.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार चोपडांशी संवाद साधता ते म्हणाले या २५ वर्षांच्या कालावधीत राजर्षी शाहू बँकेने सतत ऑडिट वर्ग ’अ’ हा दर्जा प्राप्त केला आहे. तसेच या बँकेने रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शन मध्ये ग्रेड वन मार्क प्राप्त केला आहे. या बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून या बँकेची कोअर बँकींगकडे वाट्चाल सुरु आहे. बँकेचा मार्च २००९ चा सीआरएआर चा २१.४५% रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षित मर्यादेपेक्षा १२.४५ ने जास्त आहे.

Reference :प्रकाश कुमार चोपडा २४४७१४२५/२४४७१८५१