Date:2009-11-30

पोलिसांना बुलेटप्रुफ जॅकेटसाठी बिनव्याजी कर्जाची विद्या सहकारी बँकेची योजना

s

पुणे : गेल्या वर्षी २६/११ रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व शहिदांच्या प्रथम स्म्रुतिनिमित्त पोलिस दलातील जवानांना बुलेटप्रुफ जॅकेटच्या खरेदीसाठी विद्या सहकारी बँकेने एक लाख रुपयांपर्यंतची बिनव्याजी कर्ज योजना जाहीर केली आहे. बँकेचे कार्यवाह संचालक विद्याधर अनास्कर यांनी या योजनेची महिती पत्रकारांना दिली. ते पुढे म्हणाले "पाईंट ब्लॅक बॉडी आर्मर" कंपनीने पुण्यातील "ट्रिनिटी ग्लोबल फाऊंडेशन" मार्फत भारतीय बाजारात ही जॅकेटस उपलब्ध करुन दिली आहेत. या त-हेचे जॅकेट अमेरिकन जवान वापरतात. पोलिस खात्यातील जवानांसाठी सुमारे १० किलो वजनाच्या या जॅकेटची किंमत सुमारे २.५ लाख रु. आहे. एके-५६ रायफलच्या गोळ्यांचा वर्षाव झेलण्याची क्षमता त्यात आहे.

Reference :विद्या सहकारी बँक.