Date:2009-11-27

बँक ऑफ इंडियाने पटकावले एका वर्षात तीन पुरस्कार

s

पुणे : आपल्या ग्राहकांसाठी बँकींग सेवेपलीकडेही स्नेहबंध जोडण्याचे आपले घोषवाक्य स्वीकारलेल्या बँक ऑफ इंडिया ला २००९ या एकाच वर्षी तीन महत्वपूर्ण सन्मान / पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एनडी टीव्ही ने बँक ऑफ इंडियाची यंदाची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्क्रुष्ट बँक म्हणून निवड केली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्स व एन आय इ एल एस इ आर यांनी १०४ वर्षांच्या बँक ऑफ इंडियाची सर्वांत विश्वासार्ह बँक इक्विटी म्हणून यंदा निवड केली आहे. २००९ चा डीयूएन ऍन्ड ब्रँड स्ट्रीट सार्वजनिक क्षेत्रातील व एकूण बँकींग क्षेत्रातील सर्वोत्क्रुष्ट बँकेचा पुरस्कार देखील बँक ऑफ इंडियाने पटकावला आहे.

Reference :बँक ऑफ इंडिया झोनल ऑफीस : ०२०- २५५३५४२१.