Date:2009-11-10 मराठवाड्याचे व्यंकटराव शिंदे यांना जे. आर. डी. टाटा पुरस्कारsमराठवाड्याचे व्यंकटराव शिंदे यांना जे. आर. डी. टाटा पुरस्कार पुणे, दि. १० - मराठवाद्याचे उद्योगपती व एस एस व्ही एंजिनियरिंगचे व्यवस्थापकिय संचालक श्री. व्यंकटराव शिन्दे यांच्यासह चौघांना यंदाचा भारतरत्ना जे. आर. डी. टाटा उद्योगभूषण पुरस्कार नुकतच जाहीर झाला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल ( डिस्ट्रिक्टस क्र. ३२३ डी - २) यांच्यातर्फ़े देण्यात येतो. व्यंकटराव शिंदे यांच्याखेरीज इतर पुरस्कार्थींची नावे अशी- प्राज एंजिनियरिंग वर्क्सचे संचालक श्री. बथुवेल उत्तमराव बलीद, राधेय मशिनिंगचे श्री. धनंजय भार्गव आणि थिसेन कृप इंडस्ट्रिजचे व्यवस्थापक, ( मनुष्याबळ विकास विभाग) श्री. मनोज राणे. पुरस्कार वितरण रविवार दि. १५ नोव्हे. रोजी सकाळी १० वाजता चिंचवडच्या एस के एफ़ युनियन सभागृहात होणार आहे. यावेळी टाटा मोटोर्सचे महाव्यवस्थापक प्रशांत आहिर हे प्रमुख पाहुणॆ म्हणून तर व्यवस्थापनशास्त्रज्ञ हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लायन्स क्लबचे प्रांतपाल फत्तेचंद रांका यांची विशेष उपस्थिती राहील. श्री. व्यंकटराव शिंदे हे मराठवाड्यातील आंबेजोगाई जिल्ह्यातील भारज गावचे. परळी थर्मल मध्ये छानशी नोकरी करावी असं साधं स्वप्न बाळगलेला युवक पण नियतीला शिंदे यांना उद्योगपती म्हणून घडवयाचे होते. त्याकाळी शुन्याधारित अर्थ संकल्प आल नि शिंदेंच नोकरीच स्वप्न भंग पावलं. मग ते शल्य उरी घेऊन ते पुण्यात आले. एका छोट्याशा फ़र्म मध्ये अवघ्या ८५० रु. वेतनावर नोकरीस लागले. सहा वर्षे नोकरी केली. नंतर स्वत:चा व्यवसाय सुरु केला. तो छोटा उद्योग आता बहरला आहे त्यांच्या कंपनीत ६०० पर्यंत कामगार काम करत आहेत. ते आता अनेकांचे मार्गदर्शक झाले आहेत. Reference : |