Date:2009-12-02

राष्ट्रीय साक्षरता मिशनला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल - आमदार बागवे

s

पुणे : ग्रामीण भागातील गरजु व गरीब विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय साक्षरता मिशनने काम करावे. दलित मागासवर्गीयांच्या दारात संगणक शिक्षण पोचले पाहिजे. त्यातूनच स्वर्गवासी राजीव गांधींच्या स्वप्नातील भारत उभा राहणार असून महाराष्ट्र सरकार त्यासाठी संपूर्ण सहकार्य करेल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे ग्रुहराज्य मंत्री आमदार रमेश बागवे यांनी केले. राष्ट्रीय साक्षरता मिशन आय टी एज्युकेशनच्या राज्यस्तरीय परिषदेत सेंच्युरियन हॉटेलमध्ये आमदार बागवे यांचा चेअरमन संजीवकुमार सिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यातील केंद्र संचालकांना, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बागवे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय साक्षरता मिशनचे राष्ट्रीय चेअरमन संजीवकुमार सिंग, राष्ट्रीय समन्वयक राजेश वर्मा, युवक बिरादरीचे संचालक सुधीर मेहता, अनिल बिहानी, नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह देशाच्या विविध भागातील समन्वय आणि राज्यभरातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. आमदार जोशींना विश्वास- साक्षरता मिशनचे कार्य हे राष्ट्रीय कार्य असून महाराष्ट्र सरकारचेही गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे ध्येय आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असून आज या शहरातून राष्ट्रीय साक्षरता मिशन आय टी एज्युकेशनच्या इआरपी वर आधारित इंडस्ट्रियल अकाऊंट अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास विधानपरिषद सदस्य आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

Reference :राजेश वर्मा-राष्ट्रीय समन्वयक- ०९३२५७३८०७१