Date:2009-11-25 रुपी बँकेचा ९७ वा वर्धापन दिन उत्साहात साजराs![]() पुणे : प्रतिष्टित मान्यवर व हितचिंतक यांच्या उपस्थितीत साजरा झाला. ९७ व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेच्या ३६ शाखा व ४ विस्तारित कक्ष येथे सर्वांसाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. विजयानगर कॉलनीतील बँकेच्या मुख्यालयातही २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत आयोजित केलेल्या स्वागत समारंभास माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया, माजी आमदार आणि लोकसेवा सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, नगरसेविका माधुरी मिसाळ, जनता सहकारी बँकेचे कार्याध्यक्ष अरविंद खळदकर, मॅक्स न्यूयार्क इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक सचिन मेहरोत्रा, भिडे, साखरे, ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय अधिकारी श्रीकांत, कुलकर्णी आदि क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या समारंभास उपस्थित राहून बँकेस शुभेच्छा दिल्या. बँकेचे अध्यक्ष ऍड. ग. हे. देव , तसेच संचालक चोरबेले, ओसवाल, बहिरवाडे, कोतवाल, सोनावणे, तांबे आणि अन्य संचालक व बँकेचे अधिकारी यांनी निमंत्रितांचे स्वागत केले. Reference :रुपी को - ऑपरेटिव्ह बँक. फोन नं. ०२०-२४३३६५९८ |