Date:2009-11-07

विद्या सहकारी बॅंकेस उत्क्रुष्ठ नागरी सहकारी बॅंक पुरस्कार

s

दि महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक फेडरेशन , मुंबई यांच्यातर्फे राज्यातील नागरी सहकारी बॅंकांना दिला जाणारा उत्कृष्ट नागरी पुरस्कार सहकारी बॅंक पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच दि. २७ ऑक्टोबर २००९ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त , मा. डॉ. कृष्णा लव्हेकर यांच्या हस्ते व फेडरेशनचे अध्यक्ष , मा. खासदार आनंदरावजी अडसुळ यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्वात वेगाने प्रगतीपथावर येणारी बॅंक या गटात विद्या सहकारी बॅंकेस द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या बॅंकेच्या मुख्य कार्यालयासह १२ शाखा असून बॅंकेच्या व्यवसाय रु. ४०० कोटी इतका आहे. बॅंकेस रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ’ग्रेड वन’ दिली असून वैधानिक लेखापरीक्षणात बॅंकेने ’अ’ दर्जा प्राप्त केला आहे.

Reference :बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी