Mahesh : 9011011188
margrelations@dataone.in margrelationspune@gmail.com

 

 
Home | About Us | Our Team | Services | Our Approach | Clients | Enquiry | Contact Us
Case Study | Photo Gallery

News











image advertisement

2010-12-22
icici bank
Reference : sdssd

बँक ऑफ इंडियाची स्टार ग्रुहकर्ज योजना

2010-01-22
बँक ऑफ इंडियाने स्टार ग्रुहकर्ज योजना नुकतीच सुरू केली असून त्या अंतर्गत २८ फेब्रुवारीपर्यन्त कर्ज घेणा-यास ते पहिल्या दोन वर्षांसाठी ८% ने उपलब्ध होणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या कर्ज योजनेत परतफेडीसाठी सुलभ ह्प्ते, कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे झटपट निर्णय घेउन अल्पावधीत कर्जाची उपलब्धता होते. बँक ऑफ इंडियाच्या ८ प्रकारच्या ठेव योजना असून ५ प्रकारच्या कर्ज योजना आहेत. याशिवाय बँक सोन्यांची नाणी , जीवन बीमा , डेबीट कम एटीएम कार्ड योजना, गोल्ड कार्ड व म्युच्युअल फंड इ. योजना राबवते. तसेच बँकेची १० वर्षांखालील मुलांसाठी खास बचत योजना आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : २५५३५४२१, ५२५३५४१४
Reference :

राष्ट्रीय साक्षरता मिशनला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल - आमदार बागवे

2009-12-02
पुणे : ग्रामीण भागातील गरजु व गरीब विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय साक्षरता मिशनने काम करावे. दलित मागासवर्गीयांच्या दारात संगणक शिक्षण पोचले पाहिजे. त्यातूनच स्वर्गवासी राजीव गांधींच्या स्वप्नातील भारत उभा राहणार असून महाराष्ट्र सरकार त्यासाठी संपूर्ण सहकार्य करेल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे ग्रुहराज्य मंत्री आमदार रमेश बागवे यांनी केले. राष्ट्रीय साक्षरता मिशन आय टी एज्युकेशनच्या राज्यस्तरीय परिषदेत सेंच्युरियन हॉटेलमध्ये आमदार बागवे यांचा चेअरमन संजीवकुमार सिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यातील केंद्र संचालकांना, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बागवे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय साक्षरता मिशनचे राष्ट्रीय चेअरमन संजीवकुमार सिंग, राष्ट्रीय समन्वयक राजेश वर्मा, युवक बिरादरीचे संचालक सुधीर मेहता, अनिल बिहानी, नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह देशाच्या विविध भागातील समन्वय आणि राज्यभरातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. आमदार जोशींना विश्वास- साक्षरता मिशनचे कार्य हे राष्ट्रीय कार्य असून महाराष्ट्र सरकारचेही गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे ध्येय आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असून आज या शहरातून राष्ट्रीय साक्षरता मिशन आय टी एज्युकेशनच्या इआरपी वर आधारित इंडस्ट्रियल अकाऊंट अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास विधानपरिषद सदस्य आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
Reference : राजेश वर्मा-राष्ट्रीय समन्वयक- ०९३२५७३८०७१

पोलिसांना बुलेटप्रुफ जॅकेटसाठी बिनव्याजी कर्जाची विद्या सहकारी बँकेची योजना

2009-11-30
पुणे : गेल्या वर्षी २६/११ रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व शहिदांच्या प्रथम स्म्रुतिनिमित्त पोलिस दलातील जवानांना बुलेटप्रुफ जॅकेटच्या खरेदीसाठी विद्या सहकारी बँकेने एक लाख रुपयांपर्यंतची बिनव्याजी कर्ज योजना जाहीर केली आहे. बँकेचे कार्यवाह संचालक विद्याधर अनास्कर यांनी या योजनेची महिती पत्रकारांना दिली. ते पुढे म्हणाले "पाईंट ब्लॅक बॉडी आर्मर" कंपनीने पुण्यातील "ट्रिनिटी ग्लोबल फाऊंडेशन" मार्फत भारतीय बाजारात ही जॅकेटस उपलब्ध करुन दिली आहेत. या त-हेचे जॅकेट अमेरिकन जवान वापरतात. पोलिस खात्यातील जवानांसाठी सुमारे १० किलो वजनाच्या या जॅकेटची किंमत सुमारे २.५ लाख रु. आहे. एके-५६ रायफलच्या गोळ्यांचा वर्षाव झेलण्याची क्षमता त्यात आहे.
Reference : विद्या सहकारी बँक.

 

बँक ऑफ इंडियाने पटकावले एका वर्षात तीन पुरस्कार

2009-11-27
पुणे : आपल्या ग्राहकांसाठी बँकींग सेवेपलीकडेही स्नेहबंध जोडण्याचे आपले घोषवाक्य स्वीकारलेल्या बँक ऑफ इंडिया ला २००९ या एकाच वर्षी तीन महत्वपूर्ण सन्मान / पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एनडी टीव्ही ने बँक ऑफ इंडियाची यंदाची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्क्रुष्ट बँक म्हणून निवड केली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्स व एन आय इ एल एस इ आर यांनी १०४ वर्षांच्या बँक ऑफ इंडियाची सर्वांत विश्वासार्ह बँक इक्विटी म्हणून यंदा निवड केली आहे. २००९ चा डीयूएन ऍन्ड ब्रँड स्ट्रीट सार्वजनिक क्षेत्रातील व एकूण बँकींग क्षेत्रातील सर्वोत्क्रुष्ट बँकेचा पुरस्कार देखील बँक ऑफ इंडियाने पटकावला आहे.
Reference : बँक ऑफ इंडिया झोनल ऑफीस : ०२०- २५५३५४२१.

रुपी बँकेचा ९७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

2009-11-25
पुणे : प्रतिष्टित मान्यवर व हितचिंतक यांच्या उपस्थितीत साजरा झाला. ९७ व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेच्या ३६ शाखा व ४ विस्तारित कक्ष येथे सर्वांसाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. विजयानगर कॉलनीतील बँकेच्या मुख्यालयातही २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत आयोजित केलेल्या स्वागत समारंभास माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया, माजी आमदार आणि लोकसेवा सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, नगरसेविका माधुरी मिसाळ, जनता सहकारी बँकेचे कार्याध्यक्ष अरविंद खळदकर, मॅक्स न्यूयार्क इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक सचिन मेहरोत्रा, भिडे, साखरे, ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय अधिकारी श्रीकांत, कुलकर्णी आदि क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या समारंभास उपस्थित राहून बँकेस शुभेच्छा दिल्या. बँकेचे अध्यक्ष ऍड. ग. हे. देव , तसेच संचालक चोरबेले, ओसवाल, बहिरवाडे, कोतवाल, सोनावणे, तांबे आणि अन्य संचालक व बँकेचे अधिकारी यांनी निमंत्रितांचे स्वागत केले.
Reference : रुपी को - ऑपरेटिव्ह बँक. फोन नं. ०२०-२४३३६५९८

पुण्याच्या राजर्षी शाहू बँकेला सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून सन्मान

2009-11-19
पुणे:- गेल्या २५ वर्षांपासून बँकींग क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करणा-या राजर्षी शाहू बँकेला महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन तर्फे घेण्यात आलेल्या २०० कोटीच्या आतील बँकांच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून सन्मानित करण्यात आले. तत्कालीन सहकार आयुक्त व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे निबंधक डॉ. कृष्णा लव्हेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी हा पुरस्कार स्विकारला. या वेऴी बँकेचे अध्य्क्ष्य आबासाहेब शिंदे, संचालक सुधाकरराव पन्हाळे, माजी उपाध्य्क्ष बाळासाहेब वणवे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार चोपडा आदि उपस्थित होते.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार चोपडांशी संवाद साधता ते म्हणाले या २५ वर्षांच्या कालावधीत राजर्षी शाहू बँकेने सतत ऑडिट वर्ग ’अ’ हा दर्जा प्राप्त केला आहे. तसेच या बँकेने रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शन मध्ये ग्रेड वन मार्क प्राप्त केला आहे. या बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून या बँकेची कोअर बँकींगकडे वाट्चाल सुरु आहे. बँकेचा मार्च २००९ चा सीआरएआर चा २१.४५% रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षित मर्यादेपेक्षा १२.४५ ने जास्त आहे.
Reference : प्रकाश कुमार चोपडा २४४७१४२५/२४४७१८५१

मराठवाड्याचे व्यंकटराव शिंदे यांना जे. आर. डी. टाटा पुरस्कार

2009-11-10
मराठवाड्याचे व्यंकटराव शिंदे यांना जे. आर. डी. टाटा पुरस्कार पुणे, दि. १० - मराठवाद्याचे उद्योगपती व एस एस व्ही एंजिनियरिंगचे व्यवस्थापकिय संचालक श्री. व्यंकटराव शिन्दे यांच्यासह चौघांना यंदाचा भारतरत्ना जे. आर. डी. टाटा उद्योगभूषण पुरस्कार नुकतच जाहीर झाला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल ( डिस्ट्रिक्टस क्र. ३२३ डी - २) यांच्यातर्फ़े देण्यात येतो. व्यंकटराव शिंदे यांच्याखेरीज इतर पुरस्कार्थींची नावे अशी- प्राज एंजिनियरिंग वर्क्सचे संचालक श्री. बथुवेल उत्तमराव बलीद, राधेय मशिनिंगचे श्री. धनंजय भार्गव आणि थिसेन कृप इंडस्ट्रिजचे व्यवस्थापक, ( मनुष्याबळ विकास विभाग) श्री. मनोज राणे. पुरस्कार वितरण रविवार दि. १५ नोव्हे. रोजी सकाळी १० वाजता चिंचवडच्या एस के एफ़ युनियन सभागृहात होणार आहे. यावेळी टाटा मोटोर्सचे महाव्यवस्थापक प्रशांत आहिर हे प्रमुख पाहुणॆ म्हणून तर व्यवस्थापनशास्त्रज्ञ हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लायन्स क्लबचे प्रांतपाल फत्तेचंद रांका यांची विशेष उपस्थिती राहील. श्री. व्यंकटराव शिंदे हे मराठवाड्यातील आंबेजोगाई जिल्ह्यातील भारज गावचे. परळी थर्मल मध्ये छानशी नोकरी करावी असं साधं स्वप्न बाळगलेला युवक पण नियतीला शिंदे यांना उद्योगपती म्हणून घडवयाचे होते. त्याकाळी शुन्याधारित अर्थ संकल्प आल नि शिंदेंच नोकरीच स्वप्न भंग पावलं. मग ते शल्य उरी घेऊन ते पुण्यात आले. एका छोट्याशा फ़र्म मध्ये अवघ्या ८५० रु. वेतनावर नोकरीस लागले. सहा वर्षे नोकरी केली. नंतर स्वत:चा व्यवसाय सुरु केला. तो छोटा उद्योग आता बहरला आहे त्यांच्या कंपनीत ६०० पर्यंत कामगार काम करत आहेत. ते आता अनेकांचे मार्गदर्शक झाले आहेत.
Reference :

 

तामिळ्नाड़ मर्कंटाईल बँक लिमिटेडचा ८९वा वर्धापन दिन.

2009-11-10
तामिळ्नाड़ मर्कंटाईल बँक लिमिटेडचा ८९ वा वर्धापन दिन. पुणे:- बँकींग क्षेत्रात नावलौकिक पावलेली तामिळ्नाड़ मर्कंटाईल बँकेचा ८९वा वर्धापन दिन दि. ११-११-२००९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. तरी ग्राह्कांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तामिळ्नाड़ बँकेचे पुणे जिल्हा शाखेचे व्यवस्थापक पी. रमेश यांनी केले. तामिळ्नाड़ बँकेतर्फ़े मुदत ठेवींवर आकर्ष्क ८% व्याजदर दिला जातो. गृह्कर्ज, वाहनकर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादी कर्जाला सर्व वर्गातील लोकांना परवडेल असा व्याज दर आकारला जातो आणि ते सुलभ प्रक्रियेने मिळते. अधिक माहितीसाठी संपर्क:- १३, सोलापुर बाजार रोड, कँप , पुलगेट जवळ, पुणे. शाखा व्यवस्थापक:- पी. रमेश ९९६०२२०२८८ (०२०) २६३६३०९१
Reference : शाखा व्यवस्थापक:- पी. रमेश ९९६०२२०२८८ (०२०) २६३६३०९१

विद्या सहकारी बॅंकेस उत्क्रुष्ठ नागरी सहकारी बॅंक पुरस्कार

2009-11-07
दि महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक फेडरेशन , मुंबई यांच्यातर्फे राज्यातील नागरी सहकारी बॅंकांना दिला जाणारा उत्कृष्ट नागरी पुरस्कार सहकारी बॅंक पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच दि. २७ ऑक्टोबर २००९ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त , मा. डॉ. कृष्णा लव्हेकर यांच्या हस्ते व फेडरेशनचे अध्यक्ष , मा. खासदार आनंदरावजी अडसुळ यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्वात वेगाने प्रगतीपथावर येणारी बॅंक या गटात विद्या सहकारी बॅंकेस द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या बॅंकेच्या मुख्य कार्यालयासह १२ शाखा असून बॅंकेच्या व्यवसाय रु. ४०० कोटी इतका आहे. बॅंकेस रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ’ग्रेड वन’ दिली असून वैधानिक लेखापरीक्षणात बॅंकेने ’अ’ दर्जा प्राप्त केला आहे.
Reference : बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

 

Home | About Us | Our Team | Services | Our Approach |Clients | Enquiry | Contact Us
Events | Articles | Case Study | Photo Gallery | FAQ| Careers © Copyright MARG Relations, 2010